व्वा रे कोरोना... आयटीआयच्या 20 हजार विद्यार्थ्यांवर आणली ही वेळ...

Corona : students of ITI have job worries along with exams
Corona : students of ITI have job worries along with exams
Updated on

चंद्रपूर  ः कोरोना विषाणूची झळ सर्वच क्षेत्राला बसली. यातून शिक्षण क्षेत्रही सुटले नाही. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचानालयाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना कोरोनाचा मोठा फटका बसला. यंदाच्या सत्रात चाळीस दिवसांचे प्रशिक्षणही पूर्ण करता आले नाही. प्रशिक्षणच पूर्ण न झाल्याने परीक्षा तरी कशा घ्यायचा, असा प्रश्‍न नॅशनल कौन्सिल फॉर व्होकोशनल ट्रेनिंग संस्थेपुढे निर्माण झाला आहे. परीक्षा न झाल्याने नोकरीची चिंताही आयटीआयत शिकत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना लागली आहे. 

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पूर्व विदर्भातील जवळपास 18 ते 20 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागले आहे. गेल्या काही वर्षांत शासकीय कार्यालयांत नोकऱ्या मिळणे कठीण होऊन गेले आहे. त्यामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. येथून कुठलेही प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळतो. काही वर्षांपासून विविध कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना रोजगारही उपलब्ध करून देत असल्याने आयटीआय प्रवेशासाठी मोठी स्पर्धा वाढल्याचे चित्र आहे. 

शासकीय, खासगी आयटीआयत इलेक्‍ट्रीशियन, वायरमॅन, फिटर, टर्नल, मशीनिस्ट, पंप मेकॅनिक, डिझेल मेकॅनिक, ट्रॅक्‍टर मेकॅनिक, इलेक्‍ट्रॉनिक्‍स मेकॅनिक, हेअर ऍण्ड स्कीन केअर, कटिंग ऍण्ड सुईंग, फॅशन टॅक्‍नॉलॉजी, संगणक आणि बेकरी ऍण्ड कनफेक्‍शनरी यांसह विविध अभ्यासक्रमांतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये दरवर्षी मोठी स्पर्धा असते. आयटीआयच्या परीक्षा साधारणपणे जून, जुलै महिन्यात दरवर्षी होतात. 

पूर्व विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली, भंडार आणि गोंदिया येथे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. जिल्हा आणि तालुकास्तरावर असलेल्या या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत जवळपास 18 ते 20 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. एक ऑगस्टपासून नवीन सत्र सुरू होते. यंदा नवीन सत्र सुरू झाले. मात्र, मागील सत्रातील शेकडो विद्यार्थ्यांच्या परीक्षा कोरोनात अडकून पडल्या आहेत. परीक्षेसाठी चाळीस दिवसांचे प्रशिक्षण आवश्‍यक असते. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाने हातपाय पसरले. त्यामुळे नॅशनल कौन्सिल फॉर व्होकोशनलसमोर परीक्षा तरी कशा घ्यायचा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

दिल्लीतील नॅशनल कौन्सिल फॉर व्होकोशनल ट्रेनिंग संस्था राज्यातील शासकीय आणि खासगी आयटीआयतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि प्रमाणपत्र देते. कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात आल्यानंतर या परीक्षा होण्याची शक्‍यता आहे. तूर्तास एक वर्षीय अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची परीक्षा न घेता त्यांना पुढच्या सत्रात प्रवेश देण्यात येण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू आहेत, तर दोन वर्षीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा कोरोनाची परिस्थिती आटोक्‍यात आल्यानंतर घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. 


कॅम्पस इंटरव्ह्यूहमधून वगळण्याची भीती 


गेल्या काही वर्षांत औरंगाबाद, पुणे आणि मुंबई येथील विविध कंपन्या कॅम्पस इंटरव्यूह घेऊन आयटीआय विद्यार्थ्यांना रोजगार देतात. मात्र, यंदा परीक्षाच झाल्या नाही. त्या कधी होणार याबाबत संभ्रम आहे. अशा परिस्थितीत कॅम्पस इंटरव्ह्यूह झाल्यास त्याला तोंड कसे द्यायचे आणि नोकरी कशी मिळवायची याची चिंता प्रशिक्षणार्थ्यांना लागली आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.